परि अमृतातेही पैजा जिंके
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
बोलतो मराठी
अवघे विश्व तरावे
जिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे

जागतिक महिला दिना निमित्त मराठी वेबसाईट्स डॉट कॉमने महिला व्यावसायिकांसाठी ई-दुकानदारी या विषयावर मोफत व्याख्यान आयोजित केले आहे.
भारतातील इंटरनेट व ई-कॉमर्सचा वापर अत्यंत झपाट्याने वाढत आहे. आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी या अत्याधुनिक माध्यमांचा वापर करणे हे सर्वच व्यावसायिकांसाठी महत्वाचे बनत चालले आहे. विशेषतः जाहिराती व मार्केटींगसाठी मोठा खर्च करण्याची क्षमता नसणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना अथवा घरगुती उत्पादकांना इंटरनेट व ईकॉमर्सचा योग्य वापर करून घेऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार झपाट्याने वाढवणे शक्य आहे.
महिला दिनाचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या या व्याख्यानामध्ये, महिला व्यावसायिक,घरगुती उत्पादक व बचतगट यांना आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी इंटरनेट आणि सोशल मिडीयाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल, तसेच अत्यंत कमी खर्चात स्वत:चे ई-दुकान थाटून आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.
मराठी वेबसाईट निर्मितीच्या क्षेत्रामध्ये गेली ३ वर्षे सातत्याने काम करणारे श्री प्रसाद शिरगांवकर हे या सत्राचे व्याख्याते आहेत.
प्रवेश विनामूल्य. मर्यादित जागा असल्याने पूर्वनोंदणी आवश्यक. नोंदणीसाठी संपर्क - ८८८८८१०६०० / ८८८८८ १०६०१.
शुक्रवार, दि. ९ मार्च रोजी दुपारी २.०० ते ४.००
स्थळ: पत्रकार भवनाचे कमिन्स सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे