मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा आम्ही देतो...

समाज सेवी संस्थासाठी मराठी वेबसाईट बनविण्याचे मोफत प्रशिक्षण

Sanghatan Webमराठी वेबसाईट बनविण्यासाठी मोफत प्रशिक्षण मिळणार.
मराठी वेबसाईट डॉट कॉमचा नवीन सामाजिक उपक्रम.

सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांना आपली स्वतःची मराठी वेबसाईट स्वतःच बनवता येईल. यासाठी पूरक व उपयुक्त ठरेल असे सॉफ्टवेअर पुण्यातील मराठी वेबसाइट डॉट कॉम या संस्थेने विकसित केले आहे. याची मदत घेऊन सामाजिक प्रश्नांसाठी सेवाभावी वृत्तीने, आर्थिक फायद्याचा विचार दूर ठेवून काम करणाऱ्या. स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटना आता आपली स्वतःची वेबसाईट स्वतःच तयार करू शकणार आहेत. त्यामुळे आपापल्या क्षेत्रातील अशा संस्थांचे कार्य इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र पोहचू शकेल.

हे काम सुलभतेने करता यावे यासाठी इच्छुक संस्थांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना या नवीन सॉफ्टवेअरच्या वापराचे प्रशिक्षणही मोफत देण्यात येणार आहे. मराठी वेबसाईट डॉट कॉमने सामाजिक दृष्टिकोनातून हे सॉफ्टवेअर विकसित केले असून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीसाठीच मोफत प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे अशी माहिती संस्थेचे संचालक प्रसाद शिरगांवकर यांनी दिली.

स्वयंसेवी संस्थाचा कारभार प्रामुख्याने देणग्यांवर अवलंबून असतो. अपुरा निधी ही सामान्यतः सर्वच संस्थांपुढील समस्या असते. त्यामुळे वेबसाईट निर्मितीचा व्यवसायिक खर्च अशा संस्था करू शकत नाहीत. तेव्हा सामाजिक कार्यातील आमचे योगदान म्हणून हा प्रकल्प हाती घेतला आहे.

विविध संस्थांनी या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या उपक्रमाद्वारे मराठी वेबसाईट डॉट कॉम आपला तिसरा वर्धापनदिन साजरा करीत आहे. यासंबंधीच्या प्रशिक्षणासाठी दि. ०४ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत सिंबायोसिस इंस्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर स्टडिज अॅण्ड रिसर्च (SICSR), अतुर सेंटर, मॉडेल कॉलनी, पुणे या ठिकाणी एका मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

मर्यादित जागा, पूर्व नोंदणी आवश्यक

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
फॊन नं: (०२०) २५४५४९२१
मॊबाईल नं: ८८८८८१०६०१

www.marathigazal.com

marathigazal.com

www.sadha-sopa.com

sadha-sopa.com

www.maharshivinod.org

maharshivinod.org