परि अमृतातेही पैजा जिंके
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
बोलतो मराठी
अवघे विश्व तरावे
जिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
आमच्या अत्यंत वेगाने वाढणार्या या व्याबवसायिक उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला खालील प्रकारच्या व्यक्तींची आवश्यकता आहे -
ग्राहक सेवा अधिकारी (Client Service Executive)
कामाचे स्वरूप:
मराठी वेबसाईट्स डॉट कॉम च्या सध्याच्या व संभाव्य ग्राहकांशी सततचा संपर्क ठेवणे, त्यांच्या आपल्याकडून असलेल्या सेवा अपेक्षा व त्यांच्या वेब तंत्रज्ञानविषयक गरजा जाणून घेणे, या अपेक्षा व गरजांविषयी आपण तयार केलेले उपाय (Solutions) ग्राहकांना समजावून सांगणे व या उपायांची अंमलबजावणी ग्राहकांच्या अपेक्षेनुसार होत आहे का यावर लक्ष ठेवणे. एकूणात आपले ग्राहक व आपले तंत्रज्ञान विकसक यांच्यामधील समन्वय साधणारा दुवा बनणे.
उमेदवाराकडून अपेक्षा :
पदवीधर(कोणतीही शाखा), उत्कृष्ट संवाद कौशल्य (मराठी + इंग्रजी), प्रसन्न व्यक्तिमत्व व 1 ते 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक. संगणक, इंटरनेट, ईमेल इत्यादीचा अत्यंत शिताफीने वापर करता येणे अत्यावश्यक!
ग्राहकांशी बोलून, त्यांच्या गरजा जाणून घेऊन, त्यावर उपाय शोधण्याचे अंगभूत कौशल्य व ग्राहकांच्या संतोषासाठी झटण्याचा दृष्टिकोन असल्यास प्राधान्य
जाहिरात एजन्सी अथवा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ग्राहक सेवा अथवा मार्केटिंग विभागात काम केले असल्यास उत्तम!
या जागेसाठी अर्ज करायचा असल्यास येथून संपर्क साधा: